मेहकर फाट्यावर ॲम्बुलन्सला लक्झरीने उडवले! "व्हॉइस ऑफ मीडिया" चे पदाधिकारी देवासारखे धावून आले! वाचा नेमक काय घडल...

 
Cghu
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 
विष प्राशन केलेल्या युवकांचे प्राण वाचवण्यासाठी भरधाव वेगात जाणाऱ्या ॲम्बुलन्स ला लक्झरी बसने जोरदार धडक दिली. चिखली तालुक्यातील  मेहकर फाट्यावर आज,१३ मार्चच्या सायंकाळी ही घटना घडली. यावेळी तिथून एका कार्यक्रमासाठी जात असलेले व्हॉईस ऑफ मीडियाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष  अनिल म्हस्के पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या कारमधून ॲम्बुलन्समधील रुग्णाला खाजगी दवाखान्यापर्यंत पोहोचवून त्याला तातडीने उपचार उपलब्ध करून दिले. 

 Ghi

मेहकर तालुक्यातील कारखेड येथील तरुण कैलास मंजुळकर याने विष प्राशन केले होते. त्याला एका रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चिखलीकडे आणण्यात येत होते. दरम्यान मेहकर फाट्यावर सैलानी यात्रेतून आलेल्या भरगच्च लक्झरीने  ॲम्बुलन्सला जोरदार धडक दिली. सुदैवाने ॲम्बुलन्स पलटी होता होता वाचली. यावेळी बघ्यांची बरीच गर्दी झाली.

मात्र कुणीही त्यांच्या मदतीला पुढे येईना. त्याचवेळी व्हाईस ऑफ मीडियाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, प्रभाकरराव बाहेकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण जैन व सरचिटणीस सिद्धार्थ आराख या सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णाला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. स्वतःच्या गाडीमध्ये रुग्णाला टाकून त्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचविले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. "तुम्ही देवासारखे धावून आलात, देवासारखे येऊन आमची मदत केली अशा भावना यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी  व्यक्त केल्या.