मेहकर - खामगाव भरधाव एसटी बस बाभळीच्या झाडाला धडकली! मेहकर तालुक्यातील घटना; २५ जणांना दुखापत

 
Ghjh
मेहकर( अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर वरून खामगाव कडे जाणारी एसटी बस बाभळीच्या झाडाला धडकली. मेहकर तालुक्यातील पाथर्डी घाटात आज, ४ फेब्रुवारीच्या दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात २५ प्रवाशांना दुखापत झाली आहे.

  बस क्र एम .एच ४० ,एन ८२८९ ही बस मेहकर वरून खामगाव येथे जात होती.  बस चालक विवेक अश्रुजी काळे यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पाथर्डी घाटात बाभळीच्या झाडाला धडकली. अपघात एवढा भीषण होता की बसचा पत्रा तुटून झाड बसच्या केबिन मध्ये घुसले. या अपघातात बसमधील २५ प्रवाशी जखमी झाले .अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व एसटी महामंडळ प्रशासनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.