मावसदिर वहिनीला म्हणायचा "तुम्ही दिसायला खूप भारी, तुमच्यासारखी बायको भेटायला नशीब लागते"! एक दिवस स्वयंपाकघरात घुसला अन्.....! शेगावची धक्कादायक घटना

 
kraim
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मावसभावाच्या बायकोवर डोळा ठेवणारा विकृत दिर आता चांगलाच अडकलाय. मावसभावाच्या बायकोला,म्हणजे वहिनीला  गोड गोड बोलून पटवण्याचा प्रयत्न तो करीत होता...एक दिवस मावसभाऊ घरी नसतांना तो स्वयंपाक घरात घुसला.. अन् वहिनीसोबत नको ते केलं...! शेगावच्या मंगलम नगरात २० फेब्रुवारीला ही घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी  मावस दिराचा त्याच्या वहिनीवर डोळा होता. तो वहिनीला नेहमी" तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, तुमच्यासारखी बायको भेटायला नशीब लागते" असे म्हणायचा, अनेकदा सौंदर्याची स्तुती करायचा. मात्र दिर असल्याने विवाहिता त्याकडे गंमत म्हणून दुर्लक्ष करायची. मात्र दिर सातत्याने वहिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा.
 
  दरम्यान २० फेब्रुवारीच्या दिवशी  दिर विवाहितेच्या घरी आला. "वहिनी दादा कुठे आहेत?" असे त्याने विचारले. त्यावेळी ते कामावर गेलेत असे सांगून विवाहिता चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. घरी कुणीच नसल्याची संधी साधून दिर स्वयंपाक घरात घुसला, अन् विहिनीला पाठीमागून पकडत चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विवाहितेने शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून मावसदिराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.