मना विरुद्ध लग्न जुळले! अल्पवयीन मुलीने लग्नाच्या आदल्या दिवशी प्रियकरासोबत पळून जात केले विष प्राशन! खामगावची धक्कादायक घटना

 
Kraim
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मना विरुध्द विवाह जुळविला म्हणून अल्पवयीन मुलीने लग्नाच्या एक दिवसापूर्वीच आपल्या प्रियकरासह पलायन करून विष प्राशन (फिनाईल) केले. त्यामुळे या प्रेमी युगलाला उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

यावेळी सदर मुलीने दिलेल्या जबाबावरून शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलाविरुध्द बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये ८ मार्चच्या रात्री गुन्हा दाखल केला.

 खामगाव शहरातील  बाळापूर फैल भागातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे घराशेजारी राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही कुणकुण तिच्या आई- वडिलांना लागताच त्यांनी तिचा विवाह रत्नागिरी येथील तरुणाशी ठरविला होता.त्याची तयारी देखील सुरु होती. ९ मार्च रोजी तिचा विवाह होणार होता. परंतु सदर मुलीने ८ मार्च रोजीच घरून आपल्या प्रियकरासह पोबारा केला आणी विष घेवून या प्रेमी युगलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिने दिलेल्या जबाबावरून शहर पोलिसांनी सदर मुलीच्या आई - वडीलाविरुध्द बाल विवाह प्रतिबंधक कायदा कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.