एमआयडीसी मधील 'अथर्व ॲग्रोटेक'ला भीषण आग; लाखोंची हानी

 
बुलढाणा( बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी मधील अथर्व ॲग्रोटेक उद्योग प्रकल्पात आज शनिवारी अचानक आग लागली.
  कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने पाहता पाहता रौद्र सवरूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. आग मोठी असल्याने नांदुरा,शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.सुदैवाने यात कुठलेही जीवित हानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान जास्त झाल्याचे समजते.