लक्झरीची एसटीला धडक; मेहकर चिखली मार्गावरील आज सकाळचा अपघात ! महिला ठार, २५ प्रवासी जखमी

 
  मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर चिखली मार्गावरील एका खाजगी लक्झरी बसने महामंडळाच्या एसटीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू , तर २५ प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. 
बुलढाणा ते अहमदपूर मार्गे महामंडळाची बस (क्र. एम.एच २० बीएल २३७७) निघाली होती. दरम्यान, मेहकर चिखली रस्त्यावर असताना सकाळी सात वाजेच्या आसपास एक लक्झरी बस मागून धडकली आणि भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अंजली गोपाल शर्मा(२६,चिखली, जि.बुलढाणा) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतक महिला परभणीला जात असल्याचे समजते आहे. घटनेनंतर परिवहन महामंडळाचे अधिकारी राहुल देशमाने, समाधान जुमडे, प्रविण तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मेहकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रमेश बाजड, हवालदार शिवानंद केदार हे देखील अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते.