इंस्टाग्राम वरून प्रेम..वर्षभर सेक्स अन् नंतर पोलीस कंप्लेंट..! शेगावच्या विवाहितेसोबत झाले कांड! नवऱ्याला माहीत झाल्यावर.... रिलेशनचा अंत झाला वाईट..

 
Hbv b
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ती तशी ३२ वर्षाची विवाहित अन् तो देखील ३२ वर्षाचा...दोघांचा संसार तसा ठीकठाक सुरू होता..दोघेही आपापल्या संसारात गुंतलेले.. पण मध्येच खेळ झाला.. इंस्टाग्राम च्या माध्यमातून तिची समीर सोबत ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले..एवढ्यावर ते थांबले नाहीत..त्या दोघांनी अनैतिक शारीरिक संबंध देखील ठेवले..तब्बल हा प्रकार वर्षभर चालला..यातून दोघांची शारीरिक भूक भागवल्या जात होती.. समीर ने पुढे मात्र मोठा गेम केला..त्यांच्या शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडिओ फोटो त्याने काढून ठेवले होते..दोघांच्या रिलेशनची माहिती विवाहितेच्या नवऱ्याला झाल्यावर तो तिला घेऊन खामगवला रहायला गेला.. समीर देखील अधूनमधून खामगावला जाऊ लागला..तिची इच्छा नसतांना त्याने पुन्हा तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले..आता हा सगळा प्रकार तिला नकोसा होत होता, ती समीरला नकार देत होती, समीर तिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता..तिच्या नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत होता.. अखेर दोघांच्या रिलेशनचा अंत नाही वाईट झाला..तिने तडकाफडकी  पोलीस ठाणे गाठले आणि समीर विरुद्ध बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी समीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  समीर(३२, रा.शेगाव)  असे आरोपीचे नाव आहे.  पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०२३ पासून २२ एप्रिल २०२४ पर्यंत समीर शाह याने वारंवार इच्छेविरुद्ध बलात्कार केला आहे. इंस्टाग्राम या ॲपच्या माध्यमातून त्याच्याशी ओळख झाली होती. त्यातूनच एकमेकांशी व्हाट्सअप व इंस्टाग्राम वर चॅटिंग होत होती. " माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्या सोबत लग्न करतो" असे म्हणून समीर शाह हा भेटायला यायचा. व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायचा. त्यानंतर देखील तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणत त्यान अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर पीडितेच्या पतीला दोघांच्या संबंधाची माहिती झाल्याने, पीडितेच्या पतीने तिला खामगाव येथे राहण्यासाठी नेले. परंतु त्या ठिकाणीही समीर शाह याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच पतीला जीवाने मारण्याची धमकी दिली. असे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी समीर शाह अनिसशाह याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता वि. तांगडे करत आहेत.