बुलडाण्याच्या कृषी संशोधन केंद्रातील साहित्य लंपास

 
thief
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील कृषी संशोधन केंद्र कार्यालयातील लोखंडी साहित्य चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी १० जानेवारी रोजी कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. जायभाये यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कृषी संशोधन केंद्र कार्यालयाच्या परिसरातील तीन लोखंडी गेट व २० फूट लांबीचा लोखंडी पाइप चोरट्याने लंपास केला. हा प्रकार ९ जानेवारी रोजी जायभाये यांनी पाहणी केली असता उघडकीस आला. कार्यालयाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ७ जानेवारीला पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी एक व्यक्ती गेट उचलत असल्याचे अंधारात दिसले. बुलडाणा शहर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.