चला आपण दोघे दोस्त, एटीएमला जाऊन पैसे काढू... वाचा नंतर काय केले...!

खामगावातील धक्कादायक घटना
 
 
File Photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक अनोळखी व्‍यक्‍ती वृद्धाकडे आला. मलासुद्धा पैसे काढायचे आहेत, तुम्‍हालाही काढून देतो असे म्‍हणून त्‍याने वृद्धाचे एटीएममधून काढलेले १० हजार रुपये घेऊन पळ काढला. ही धक्कादायक खामगाव शहरातील खामगाव एमआयडीसी परिसरात ३० ऑक्‍टोबरला सायंकाळी सहाच्‍या सुमारास घडली. शिवाजीनगर पोलिसांनी काल, १ नोव्‍हेंबरला भामट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
गुलाबराव श्रीपतराव शेळके (७७, रा. जोशीनगर रा. घाटपुरी नाक्याजवळ, खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. शेळके यांना पैसे काढायचे असल्याने आयडीबीआयच्या एटीएमकडे येत होते. एटीएमजवळ त्‍यांना एक अनोळखी व्‍यक्‍ती भेटला. मलासुद्धा पैसे काढायचेय, तुमचेही काढून देतो, असे म्‍हणून त्‍याने एटीएममध्ये शेळके यांना सोबतच नेले. तिथे विश्वासात घेऊन शेळके यांच्‍या कार्डच्या साह्याने १० हजार रुपये काढले. नंतर तिथून पळ काढला. तपास नापोकाँ सागर भगत करत आहेत.