LCB ची दमदार कारवाई? जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा "पर्दाफाश"! ४ गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा! अकोल्याच्या "शेख शकील" गजाआड..!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात काही दिवसात जनावरे चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. मात्र "एलसीबी" ने या प्रकरणाची सूत्रे हाती घेताच ४ गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात एलसीबीला यश आले आहे . या प्रकरणात एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीकडून एक इनोव्हा गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. 
 स्थानिक गुन्हे शाखेने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकारानुसार आरोपीचे नाव शेख शकील शेख जलील (४२) असे असून तो अकोला शहरातील जुन्या गावचा रहिवासी आहे. त्याच्याकडून त्याने गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे. शकील याची अधिक चौकशी केल्यानंतर आणखी ३ गुन्हे उघडकीस आले असून त्या गुन्ह्यातील आरोपी देखील निष्पन्न झाले आहेत. निष्पन्न झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशानुसार सपोनि आशिष चेचरे, पोहेका राजेंद्र अंभोरे, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, अमोल शेजोळ, जयंत बोचे, अजीज परसुवाले, समाधान टेकाळे यांनी केली.