एलसीबीचा 'पोलिसी खाक्या!' तब्बल ९ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त! जलंब, पिंपळगाव राजा, मलकापूर ग्रामीण व जा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई..

 
Ghufh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हा पोलीस दलाचे मूलभूत अंग असणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध धंद्याला चाप लावण्यासाठी पोलिसी खाक्या दाखविणे सूरू केलंय.काल ७ फेब्रुवारीला स्थागुशा प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकांनी अवैध गुटखा, गौण खनिज वाहतूक, देशी दारू बाळगणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत तब्बल ९ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील जलंब, पिंपळगाव राजा, मलकापूर ग्रामीण व जानेफळ पोलीस ठाण्यात ४ आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात अवैध धंदे मूळ धरत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली. पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, पोना. विजय वारुळे, पोकॉ. सतीश जाधव, मपोकॉ. सरीता वाकोडे स्था.गु.शा. बुलडाणा

यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पो.स्टे. जलंब हद्दीत गुटखा वाहतुकीवर रेड करून आरोपी अनिल किसनराव खराटे रा.पारखेड ता. खामगांव यांच्या ताबेतील मोटार सायकलीवरील प्रतिबंधीत केसर युक्त विमल कंपनीचा गुटखा, एक मोटार सायकल असा एकूण १,१६,४२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सफौ. दशरथ जुमडे,पोकॉ. मनोज खरडे स्था.गु.शा. बुलडाणा यांच्या पथकाने पिंपळगांव राजा पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा अवैध गुटखा पकडला. आरोपी अजय गोविंदा बोंबटकार रा. पिंपळगांव राजा ता.खामगांव याच्या ताब्यातील मोटार सायकलवर केसर युक्त विमल कंपनीचा ९९,००० रुपयांचा गुटखा,एक मोटार सायकल असा एकूण १,५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोहेकॉ. राजेंद्र अंभोरे, पोकॉ.अमोल शेजोळ स्थागुशा बुलडाणा यांचे पथक अवैध गौण खनिज वाहतूक कारवाई संबंधाने ग्राम वडोदा परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना,आरोपी प्रविण त्र्यंबक सातव रा. बहापूरा मलकापूर याला टिप्परमध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेतीची वाहतूक करतांना पकडण्यात आले.

आरोपीकडून २०,००० हजार रुपये किमतीची २ ब्रास रेती आणि ७,००,००० किमतीचा एक टिप्पर असा एकूण ७,२०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच पोना. दिनेश बकाले, पोकॉ. अजीज परसुवाले स्थागुशा बुलडाणा यांच्या पथकाला जानेफळ येथे आरोपी कैलास भगवान दाभाडे रा. जानेफळ हा अवैधरित्या व विनापरवाना देशी दारु जवळ बाळगतांना मिळून आला.आरोपी कडून ६८८० रुपयांची देशी दारुच्या १२८ नग बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण चारही कारवाईमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा,देशी दारु मुद्देमाल,अवैध गौणखनिज तसेच वाहने असा एकुण ९ लाख ९७ हजार ३०८ रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. गुन्ह्यांतील आरोपी विरुद्ध संबंधीत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.