अवैध व्यवसायांविरुद्ध 'एलसीबी'ची कारवाई! अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावाल्यांना पकडले! ३२ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

 
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): 
पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशान्वये व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात 'एलसीबी'ने बेकायदा व्यवसायांविरुध्द रणशिंग फुंकले आहे. गेल्या दोन दिवसांत पथकाने विविध ठिकाणी धाडसत्र राबवून रेती तस्करी, गांजा विक्री, वरली मटका देशी दारुची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्या ताब्यातून तब्बल ३२ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचे स्तोम मोठ्या प्रमाणात माजले आहे. सद्या गणपती उत्सव सुरु असुन उद्या जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणूक आहे. या उत्सवाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात कोणतीच अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक सुनील कडासने अवैध धंद्याविरुध्द कडक मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वा स्थागुशाच्या पथकांनी विविध ठिकाणी छापेमारी केली. 
 अंढेरा पोलीस स्टेशन हद्दित टाकलेल्या छाप्यात अवैध रेती उपसा करणाऱ्या आरोपींसह रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक बोट (किंमत ४ लाख रुपये), अशोक लेलंड कंपनीचे टिप्पर (किंमत २५ लाख रुपये), ३ ब्रास बिना रॉयल्टी वाळू (किंमत ३० हजार रुपय) तसेच १ लाख २१ हजार रुपयांचे साहित्य, असे एकुण ३१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला असुन पाच आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ सह कलम २१ (१), २१ (२) गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. २५ सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरातील इकबाल चौक व मच्छी मार्केट परिसरात सुरु असलेल्या वरली मटका जुगारावर धाड २ (ब) एन.डि.पि.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २६ सप्टेंबर रोजी चिखली शहरातील रोहिदास नगरमध्ये टाकलेल्या धाडीत आरोपी राहुल अजबराव कारले (वय ३३ वर्षे) याच्या ताब्यातून अवैध देशी दारुसह ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून कारवाई करण्यात आली. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सपोनि स्वप्नील नाईक, सपोनि निलेश सोळंके, पोलीस अंमलदार लेकुरवाळे, गिरी, हेलोडे, मेहेर, अंभोरे, राजपूत, पाटील, दराडे, राठोड, शेळके, बोचे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे यांचा सहभाग होता.