कॉलेजला गेलेली लासुरा खुर्दची तरुणी बेपत्ता!

 
missing
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना शेगाव तालुक्‍यातील लासुरा खुर्द येथे समोर आली आहे.

मंगला दीपक तायडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची आई सौ. ज्योती दीपक तायडे (३५) यांनी या प्रकरणात शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, ४ जानेवारीला तक्रार दिली. मंगला ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता खामगाव येथे कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती.

घरी परत न आल्याने तिचा गावात व नातेवाइकांकडे शोध घेतला असता मिळून आली नाही. तपास पोहेकाँ ज्ञानदेव ठाकरे करत आहेत. दरम्‍यान, अंबेटाकळी (ता. खामगाव) येथूनही ३० वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली असून, रामेश्वर रतन अंभोरे हा ३ जानेवारीला बेपत्ता झाल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात त्‍याच्‍या घरच्यांनी दिली आहे.