कोकाटे विरुद्ध सोनोने ! जुन्या 'लाठ्या - काठ्या,दगड, तलवारी चालल्या; १९ जखमी! २१ जणांवर गुन्हे! खामगाव तालुक्यातील वरूड ची घटना

 
fight

खामगाव(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): जुन्या वादातून दोन गटात 'लाठ्या - काठ्या,दगड, तलवारी चालून १९ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वरुड गावात घडली आहे.दोन्ही गटाच्या तक्रारीवरन (खामगाव ग्रामीण पोलिसांनी) दोन्ही गटातील एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. झाले असे की खामगाव तालुक्यातील वरुड येथे १२ जून रोजी संध्याकाळी ६ च्या दरम्यान जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.

यामध्ये दोन्ही गटातील १९ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. वरुड येथे गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद होता. याच वादातुन (खामगाव ग्रामीण पोलिसात) यातीलच काही लोकांवर अदाखलपात्र गुन्ह्यांची नोंद सुद्धा करण्यात आली होती. १२ जून च्या संध्याकाळी पुन्हा दोन्ही गटात जोरदार वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.यामध्ये लाठ्या - काठ्या, दगड, तलवारी याचा वरून करून दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना जखमी केले. यामध्ये महिला यांचाही सहभाग होता. यामध्ये पहिल्या गटातील एकनाथ रामदास कोकाटे वय - ४०, वैष्णवी विकी कोकाटे वय - २४,शारदा एकनाथ कोकाटे वय - २६, शुभांगी मारोती कोकाटे वय- ३२, अविनाश भानुदास कोकाटे वय - २६, आकाश भानुदास कोकाटे वय - २३, मारोती वासुदेव कोकाटे वय - ४०, लोकेश श्रीकृष्ण कोकाटे वय - २३, योगेश श्रीकृष्ण कोकाटे वय - २६, रुपेश वासुदेव कोकाटे वय - ६०,(सर्व रा.वरुड तालुका- खामगाव)  हे जखमी झाले ,आहेत.

दुसऱ्या गटातील मंगेश रमेश तायडे वय -३६, सौ पूजा मंगेश तायडे वय - २३, ललिता भीमराव सोनोने वय - ५५, सागर भीमराव सोनोने वय - ३२, विशाल भीमराव सोनोने वय - ४०,  तपस्या विशाल सोनोने वय -१२, आणखी ,काही (सर्व रा.वरुड तालुका - खामगाव) असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारीवरून २१ जणांवर खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.