१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग? खामगाव हादरले.....

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशासह राज्यभरात, जिल्ह्यात महिला मुलींच्या सुरक्षा संदर्भात प्रश्न उपस्थित होत असतांनाच खामगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग झाल्याचा संशय आहे. पीडित मुलीच्या भावाने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे..
पिडीत अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची आहे. एका २५ वर्षीय तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. केशव साहेबराव हागे असे संशयित तरुणाचे नाव असून त्यानेच आपल्या बहिणीचे किडनॅपिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या रात्री पिडीत मुलगी आई आणि बहिणी सह झोपली होती. आई आणि बहिण गाढ झोपेत असताना पीडित मुलगी अचानक गायब झाली, तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नाही..त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली..