खेडेकर परिवार माजी आमदार शशिकांत खेडेकरांच्या पाठीशी! शशिकांत खेडेकर व त्यांच्या कुटुंबीयांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे चिखली पोलिसांना दिले निवेदन..!

 
dfghj

चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा विधानसभा  मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या व कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा असे निवेदन अंत्री खेडेकर येथील समस्त खेडेकर परिवाराच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनला आज,१४ जूनला देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल भास्करराव खेडेकर, शिवाजी रामराव खेडेकर, प्रदीप श्रीराम खेडेकर, संजय गुलाबराव खेडेकर,डॉ.विष्णु भगवान  खेडेकर,डॉ.शिवशंकर खेडेकर,रोहीत खेडेकर, राम खेडेकर,अनुराग खेडेकर,मिलिंद सुधाकर खेडेकर, यांचे सह समस्त खेडेकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. 

 डॉ. शशिकांत खेडेकर हे सदैव समाजसेवावृत्ती करणारे आमच्या कुटुंबातील नेतृत्व आहे. मागील काही दिवसापासून शशिकांत खेडेकर यांनी वाळू तस्करा विरुद्ध आवाज उठवला होता व शासन दरबारी पाठपुरावा करून वाळू तस्करांची पायबंदी केली होती.त्यामुळेच त्यांच्यासह कुटुंबीयांवर अशा प्रकारचे अमानुष हल्ले होत आहेत. १९ जूनला शशिकांत खेडकर यांचे चिरंजीव श्रीनिवास खेडेकर व त्यांच्या मातोश्री यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवून जो कोणी हल्लेखोर असेल त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी खेडेकर कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे चिखली पोलीस स्टेशनला केली आहे.