वर्षभरापूर्वी जिल्हाभर गाजलेल्या चितोड्यात शिल्लक कारणावरून पुन्हा राडा!;१९ जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल..

 
khamgao
खामगाव:- वर्षभरापूर्वी खामगाव तालुक्यातील चितोडा गाव संपूर्ण जिल्हाभर गाजले होते. त्यात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीय यांनी स्वतः चितोड गावाला भेट देवून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र पुन्हा एकदा दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून  चितोड्यात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

परस्परविरोधी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसात  दोन्ही गटातील १९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झाले असे की, गौतम महादेव तिडके ४९ रा. चितोडा (आंबिकापुर)  यांचा मुलगा रोहन त्याचे मित्र सुरज व प्रेम हे मोटरसायकलने गौतम तिडके याचा जेवणाचा डब्बा घेवुन शेतात जात होते. यावेळी त्यांच्या घराच्या पुलाजवळ त्यांचा मोटरसायकलचा धक्का शे. रिहान याला लागला. रिहान त्याच्या सोबत असलेले त्याचे मित्र फजल, आसीफ, समीर, शे मुजाहीद,शे.आरीफ यांनी रोहन तिडके सोबत वाद घातला.

गौतम तिडके यांच्या पत्नी अन्नपुर्णाबाई, भावजय सुनिता सिध्दार्थ तिडके, आई तुळसाबाई महादेव तिडके, मुलगा रोहन गौतम तिडके, सुरज सिध्दार्थ तिडके यांच्यासह महिलांची छेडछाड केली. भाऊ सिध्दार्थ महादेव तिडके याच्या डावे हाताचे कोणीतरी चाकूने मारुन जखमी केले आहे. १ लाख 32 हजार चोरून नेले आहे. अशी तक्रार गौतम तिडके यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे.पोलिसांनी तिडके याच्या तक्रारीवरून शेख रिहान शेख अहमद याचेसह १० जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्यात शेख रिहान शेख अहमद २० रा. चितोडा याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
१ एप्रिल रोजी रात्री ८:२० वाजताच्या दरम्यान तो त्याचे मित्र शेख मुजाहिद इकबाल, शेख आसीफ शेख यासीन, फजल खान नासीर खान, आरीफ राजा शेख शफीक यांच्यासह नमाज पठण करण्यासाठी गौतम तिडके याच्या घरासमोरुन होतो.यावेळी गौतम तिडके यांचा मुलगा रोहन गौतम तिडके हा त्याची होंडा शाईन मोटरसायकलवर त्याचे दोन मित्र सुरज सिध्दार्थ तिड़के, प्रेम कैलास तिडके यांच्यासह दुचाकीने मला कट मारला. त्याला कट का मारला विचारले तर त्या तिघांनी शिवीगाळ करून वाद घालत मारहाण केली. रोहन गौतम तिडके, सुरज सिध्दार्थ तिडके, प्रेम कैलास तिडके यांनी माझ्या खिशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला.पाईपने आणि काठीने मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून शे अयुब से शौकत,शे पिरन शे शौकत, शे रहीम से समद, शे राजीक दुकानदार यांच्यासह काही लोक धावत आले. त्यांनी आम्हाला तिडके याच्या मुलाच्या व त्याच्या मित्राच्या तावडीतून सोडविले.

असेही शेख रिहान शेख अहमद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी शे. रिहान  सिद्धार्थ याच्या तक्रारीवरून सिद्धार्थ तिडके सह एकूण ९  जनाविरुद्धगुन्हा दाखल केला आहे.