खामगाव शहर पोलिसांना चोरांचा वैताग; आणखी एक घरफोडी!

 
thief
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीवरून येऊन मुले, महिलांना गाठत मोबाइल घेऊन पळ काढणाऱ्या दोघांमुळे आधीच त्रस्त असलेल्या खामगाव शहर पोलिसांच्या वैतागात भुरट्या चोरांनीही भर घातली आहे. आता बंद घर फोडून चोरट्यांनी दागदागिन्यांसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खामगाव शहरातील ताजनगरात १ जानेवारी ते २ जानेवारीच्या रात्रीदरम्‍यान घडली. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युसूफ खान मुनीर खान (३०, रा. ताजनगर, खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून लोखडी कपाटातील रोख ७ हजार रुपये, लहान मुलाची कानातील सोन्याची ३ ग्रॅमची रिंग (किंमत १५ हजार रुपये) असा एकूणन २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तपास नापोकाँ रामेश्वर फासे  करत आहेत.