खामगाव बसस्थानक बनलेय चोरट्यांचा अड्डा! बसस्थानकावर एकाचे पाकिट, दुसऱ्याचा मोबाइल लांबवला! पोलिसांनी तिघांना पकडले..

 
vghj

खामगाव (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): खामगावचे बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनले आहे. बसस्थानकावर सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून चोरटे हात साफ करतात. असाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. एका प्रवाशाचे पाकीट तर एकाचा मोबाईल लंपास झाल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान पोलिसांनी तपासचक्र फिरवीत काही तासातच बसस्थानक परिसरातून तीन चोरटयांना अटक केली.

येथील बसस्थानकावर गौरव वसंतराव बोरे (वय ३४) रा. शेंदुर्जना घाट जि. अमरावती हे २ सप्टेंबर २३ रोजी दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिश्यातील पाकीट लंपास केले. त्यामध्ये २ हजार ७०० रुपये रोख व महत्वाची कागदपत्रे होती. तर दुसरे प्रवाशी शे. फरजान शे. इब्राहिम यांच्या खिश्यातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. दोन्ही प्रकरणी शिक्षक गौरव बोरे यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपासचक्रे फिरविली असता डिबी पथकाने बसस्थानकावरून समीरखान मजिदखान (वय ३४) रा. जळगाव खांदेश, शेख सजाद शेख अजगर (वय २१) व मो. इस्ताईल न्याहल अहमल वय ३७ दोघे रा भुसावळ या तिघांना अटक केली. इस्त्राईल न्याहल अहमद ( ३७ ) दोघे रा. भुसावळ या तिघांना अटक केली. यांच्याकडून पाकीट जप्त केले असून सदर पाकीटात २७०० रुपये रोख तसेच एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड असे महत्त्वाचे कागदपत्र आढळून आले.