खडकवासला किंकाळ्यांनी दणाणल! एकीचा पाय घरसला, वाचवायला गेलेल्या ८ जणी बुडू लागल्या! ७ मुलींना वाचवण्यात यश; बुलडाण्याच्या शीतल आणि खुशीचा बुडून मृत्यू..

 
hff
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आजचा दिवस बुलडाण्यासाठी वाईट वार्ता घेऊन आला. जिल्ह्याच्या दोन लेकिंचा खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर असलेल्या नदीत बुडून मृत्यू झालाय. एकीचा पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या ८ जणी बुडू लागल्या होत्या, त्यापैकी ७ मुलींना वाचवण्यात स्थानिकांना यश आल आहे तर दोघींचा पाण्यात बुडून करून अंत झाला आहे. खुशी संजय खुर्दे(१३, रा.सोळंके ले - आऊट, बुलडाणा), शीतल भगवान टिटोरे (१८, रा. झरी, ता.बुलडाणा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
 

प्राप्त माहितीनुसार एका लग्नानिमित्त बुलडाण्यावरून खडकवासला येथे गेलेल्या ९ मुली व काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यापैकी एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी आठ जणी धावल्या त्याही बुडाल्या, यावेळी मुलीच्या किंकाळ्या एकूण परिसरातील लोक तिथे धावले. यावेळी ७ जणींना वाचवण्यात यश आले मात्र दोघींना जलसमाधी मिळाली. ९ पैकी ८ जणींचे वय १६ वर्षांपेक्षा  कमी होते.
    टकले वस्ती गोहे खुर्द येथील खडकवासला धरणाचे बॅक वॉटर असलेल्या नदीपात्रात आज १५ मे च्या सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ७ मुलींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र खानापुर येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा परिसरात शोककळा पसरली आहे.