खादाड तहसीलदार! सिंदखेडराजाच्या तहसीलदाराने तोंड काळे केले; ३५ हजार घेतांना रंगेहाथ पकडला..!

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सिंदखेड राजा तालुक्यातून धक्कादायक बातमी आली आहे. सिंदखेड राजाचा तहसीलदार सचिन जैस्वाल याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तहसीलदारासह त्याचा चालक आणि शिपाई यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.आज १२ एप्रिल च्या दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 रेतीचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी तहसीलदार जैस्वाल याने तक्रारदाराला लाच मागितली होती.ती शिपाई ताठे आणि चालक मंगेश कुलथे यांच्या माध्यमातून स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्याआधी तक्रारीची सत्यता पडताळणी करण्यासाठी एसीबी कडून पडताळणी कारवाई करण्यात आली,तक्रारीची सत्यता समोर आल्यानंतर साफळा रचून लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.