BREAKING महाशिवरात्रीला काळ आला; मलकापूरजवळ ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात; तिघांचा जागेवरच मृत्यू

 
Accident
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यात आज महाशिवरात्रीला भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि आयशरच्या या भीषण अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालासवाडा फाट्याजवळ हा अपघात झाला. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याच्या कामामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे ट्रक आणि आयशरची समारोसमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस पोहचले असून गाडीत अडकलेल्या अन्य एकाला बाहेर काढणे सुरू आहे. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत..
 या संबंधीचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.बुलडाणा लाइव्ह वर....