रंगाचा बेरंग झाला! ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद उफाळून आला;मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडीत होळी दहनाच्या वेळी दोन गटात तुफान राडा;१७ जखमी! ५ जणांची प्रकृती गंभीर; राड्याचा व्हिडिओ व्हायरल! पहा....

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे काल होळीच्या दिवशी तुफान राडा झाला. लहान मुलांच्या भांडणाचे निमित्त ठरून दोन गटात तुफान मारहाण झाली. लाठ्या काठ्या, लाथा बुक्क्या मिळेल त्याने दिसेल त्याला बेदम कुटण्यात आले. या प्रकारात १७ जण जखमी असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. रात्रीपासून गावात पोलिसांचे दंगाकाबू पथक दाखल असून गावात संचारबंदी सदृश्य परिस्थिती आहे.
गेल्या वर्षी या गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. काल झालेल्या राड्याचे कारण प्रथमदर्शनी लहान मुलांचे भांडण दिसत असले तरी त्याला ग्रामपंचायत निवडणुकीतील गटबाजीची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गट एकाच समाजाचे आहेत. काल होळी दहनाच्या वेळी लहान मुलांमध्ये भांडण झाले. लहान मुलांनी आपल्या घरी जाऊन ते सांगितले, त्यानंतर मोठ्यांचे दोन गट भिडले. काही जखमींवर मेहकर तर गंभीर जखमींवर बुलडाण्यात उपचार सुरू आहेत.