खामगावात फिरणे मुश्किल झाले! काका पुतण्याला रस्त्यात अडवून लुटले ! ९० हजारांचा मुद्देमाल लंपास...

 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दवाखान्यात उपचारासाठी जात असताना काका आणि पुतण्याला रस्त्यामध्ये अडवून मारहाण केली. त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याची दागिने बळजबरीने हिसकावून लंपास केले. बुधवारी सायंकाळी, खामगाव शहरातील बैल बाजाराच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली.

गजानन सुखदेव कुल्हाड (३२ वर्ष) हे पुतण्या सोबत अकोला येथे दवाखान्यात उपचारासाठी निघाले होते. दरम्यान शहरातील बैल बाजाराच्या प्रवेशद्वारासमोर अक्षय गरड व त्याचा लहान भाऊ गजानन गरड, शिवाजी गरड, कासम चौधरी, रमजान चौधरी यांनी अडवून दोघा काका पुतण्याला मारहाण केली. बळजबरीने त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. असे तक्रारीत म्हटले आहे, तक्रारीवरून आरोपींविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. 
   
  वाढत्या गुन्हेगारीमुळे खामगाव शहरात चाललय तरी काय ? असा सवाल काही दिवसांपूर्वी उपस्थित झाला होता. शहरातील वाढता क्राईम रेट, पाहता शहरवासीयांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली. वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर अंकुश बसावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. असे असताना, लुटमार, चोरी, हाणामारीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही.