सात गुन्ह्यांचा आठ दिवसांत तपास! आरोपीही केले गजाआड! डीवायएसपी विनोद ठाकरेंनी थोपटली खामगावच्या पोलिसांची पाठ..!

 
fghjk

खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा)  खामगाव उपविभागामध्ये एकूण आठ पोलीस स्टेशन येतात. खामगाव शहर, शिवाजीनगर पोलिसांनी मागील आठ दिवसांत सात गुन्ह्यांचा छडा लावला आहे. अशी माहिती डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.  

 खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात २५ जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना डीवायएसपी ठाकरे म्हणाले शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गून्हे शोध पथकाने चोरीचा तपास करीत अंकुरचे कृषी केंद्राचे बियाणे, खताचे गोडाऊन फोडणारी टोळी जेरबंद केली आहे. किसन नगर (खामगाव) येथे मिरची पावडर टाकून नऊ लाख रुपयांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करणारे आरोपीही जेरबंद करण्यात आले आहेत.खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोन्याचांदीच्या दुकानातून चोरी करणाऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. खामगाव बस स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणारी महिला खामगावच्या बाळापुर फैल भागतील शाळेत चोरी करणारे आरोपी यांनाही अटक करण्यात आले आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पैशाची  चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकाने केली आहे. अशी माहिती डीवायएसपी ठाकरे यांनी दिली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी उपस्थित होते.