पत्रकार अमोल गावंडे यांच्यावर दाखल खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करा! ऑल जर्नलिस्ट टिव्ही मिडीयाचे जिल्हाध्यक्ष गोपाल तुपकर म्हणाले, हा तर निर्भिड पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्नं

 
Police
चिखली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): 
खामगाव येथील पत्रकार अमोल गावंडे यांच्यावर २० ते २५ जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी २० जणांविरुध्द पत्रकार कायद्यासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आते आहेत.
पत्रकार अमोल गावंडे हे २९ जुलैच्या रात्री नांदुरावरुन त्यांच्या कारने खामगावकडे येत होते. दरम्यान, पिंप्री देशमुख फाट्याजवळ एक दुचाकीस्वार कारसमोर आला. त्यामुळे गावडे यांनी हॉर्न वाजविला. यामुळे चिडलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून गावंडे यांच्या कारच्या बोनटवर बुक्का मारून शिवीगाळ केली व तू पारखेड फाट्यावर ये, तुला दाखवितो, अशी धमकी दिली. यानंतर गावंडे हे पारखेड फाट्यानजीक आले असता तिघांनी त्यांची गाडी अडवून वाद घातला. यावेळी २० ते २५ जण एकदम आले. त्यातील काहींनी हाच तो पत्रकार आहे, ज्याने आपली बातमी छापली होती, असे म्हणून सर्वांनी एकदम हल्ला चढवून गावंडे त्यांच्या साथीदाराला मारहाण करून जखमी केले.तसेच त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चेन (किं. १० हजार). खिशातील १७ हजार रु. हिसकावून घेतले. त्याचप्रमाणे गाडीची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. याबाबत पत्रकार गावंडे यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली असून, . पोलिसांनी याप्रकरणी गौतम बाळू बोदडे, विकास देवचंग, करण गणेश गायकवाड, अंकुश चिंधाजी बांगर, सिध्दार्थ बोदडे, आनंद बांगर, रणवीर खलंदे, प्रताप राठोड व इतर १० ते १२ जण सर्व रा. पारखेड, विरुध्द भादंविसह पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.मात्र सदर आरोपींनी अमोल गावंडे यांच्या विरोधात खोटी तक्रार दिली आहे ज्यामध्ये एट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करतांना उपविभागीय पोलिस अधिकारी हे चौकशी करून गुन्हा दाखल करतात, मात्र इथे कोणतीच चौकशी न करता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.पत्रकार अमोल गावंडे यांनी वेळोवेळी सामाजिक हित जोपण्यासाठी जिथे गरज असेल तिथे पोलीस प्रशासना विरुद्ध बातम्या केल्या, कुणी अधीकारी किंवा व्यक्ती विरुद्ध नव्हे तर यंत्रणे विरोधातील ही लढाई आहे, यातून काही अधिकारी यांनी अमोल गावंडे याना हेतुपरस्परपणे अडकाव्यासाठी क्षडयंत्र रचले आहे का..? अशी दाट शक्यता आहे, तेव्हा हा तपास तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकरे यांच्या कडून काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा आणि याबाबत वरिष्ठअधिकाऱ्यांन कडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
हा तर निर्भिड पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्नं – गोपाल तुपकर
या संपूर्ण घटनेवर ऑल जर्नलीस्टं टिव्ही मिडीयाचे जिल्हाध्यक्ष गोपाल तुपकर यांनी संताप व्यक्तं केला असून हा निर्भिड पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जातीने लक्ष घालावे व दोषींना लवकरात लवकर अटक करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.