गुंतवणुक करा, दररोज दोन टक्के व्याजाने परतावा देतो म्हणत होता; दोन लाख रुपये घेऊन गेला अन् गायबच झाला; खामगावची घटना

 
fraud

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गुंतवणुक केलेल्या रकमेवर दैनंदिन दोन टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष देत दोन लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वाशिम व अहमदनगर जिल्ह्यातील दोन आरोपींवर खामगाव शहर पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाले असे की, रविंद्र तुळशिराम गवई वय वर्ष (५९) रा - रा - भुसावळ जि - जळगाव यांनी खामगाव शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये जीवन उध्दवराव कायंदे वय वर्ष (३७), ह.मु. रिसोड जि. वाशिम, व  दत्तात्रय महादेव नलावडे वय वर्ष (३५) रा. कर्जत जि. अहमदनगर या दोघांची खामगाव रेल्वेस्थानकाजवळ गजानन ई सर्विस सेंटरमध्ये भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर दैनंदिन दोन टक्के परतावा देण्याचे सांगितले होते. त्यानुसार गवई यांनी आरोपी कायंदे याला १ लाख ८० हजार तर दुसरा आरोपी नलावडे याला २० हजार रुपये दिले होते. त्यावर आरोपींनी एकदा सहा आणि दुसऱ्यांदा पाच हजार रुपये दिले होते.  त्यानंतर कोणतीही रक्कम दिली नाही. त्यानंतर रकमेची मागणी केली असता आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले. हा प्रकार १ सप्टेंबर २०२२ च्या पूर्वी ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोउपनि निलेश लबडे करीत आहेत.