तांदुळवाडी जवळच्या अपघातात देऊळघाट येथील जखमी युवकाचा मृत्यू!

 
Nxjdn
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तांदुळवाडी नजीक झालेल्या अपघातातील गंभीर युवकाचा मृत्यू झाला आहे. शेख नसीम असे मृतकाचे नाव असून ते देऊळघाट येथील रहिवासी होते. 
बुलढाणा तालुक्यातील हतेडी येथून कडधान्याचे पोते घेवून तांदुळवाडी कडे निघालेल्या बोलेरो पिकअप मालवाहू गाडीचा बुलढाणा ते धाड मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ अचानक टायर फुटून वाहन पलटी झाले व मागे पोत्यावर बसलेले दोन युवक नसीम शेख वय २५ वर्ष रा. देऊळघाट तसेच संतोष तायडे वय ३० वर्ष रा. हतेडी हे फेकल्या गेले.यात दोघांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. तर केबिन मध्ये बसलेले चालक व शेख जावेद यांना किरकोळ मार लागला.हा अपघात १७ मार्चला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला होता. तातडीने सर्व जखमींना बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख नसीम व संतोष तायडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छ.संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते.यात शेख नसीम याचा छत्रपती संभाजी नगर पोहोचण्या आगोदरच रस्त्यात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह रात्री १० वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात परत आणले होते.