संध्याकाळी ती घरात एकटी होती! त्याने तीच संधी हेरली,घरात घुसला अन...पुढं जे घडल ते वाईट! खामगाव तालुक्यातील श्रीधरनगरची घटना

 
ghj

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तो तिच्या घरात संधीचा फायदा घेऊन घुसला अन तिचा हात धरून म्हणाला, तू मला आवडतेस छातीही दाबली. खामगाव तालुक्यातील श्रीधरनगर येथे घडलेली घटना.

खामगाव तालुक्यातील श्रीधरनगर येथील ३८ वर्षीय विवाहिता ६ जुलै रोजी संध्याकाळी ७  वाजता आपल्या घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेत अमोल देवराव गवळी ( वय वर्ष ३० रा. श्रीधरनगर ता. खामगाव) हा विवाहितेच्या घरात घुसला, तिचा हात वाईट उद्देशाने जबरदस्तीने आपल्या हातात घेऊन म्हणाला, तू मला आवडतेस असे म्हणत तिच्या अंगाला वाईट उद्देशाने कवटाळले. घडला प्रकार कुणाला सांगू नको. तू जर कोणाला काही सांगितले तर तुला अन तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकीही त्याने दिली. असे पीडित विवाहितेने  हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत  म्हटले आहे. हिवरखेड पोलिसांनी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून अमोल देवराव गवळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकॉ गजानन आहेर हे करीत आहेत.