राजूर घाटात टुकार तरुणांचा हैदोस! पंजाबच्या ट्रक चालकाला मारहाण करून लुटले

 
crime

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ट्रक चालकास मारहाण करून लुटल्याची घटना मलकापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिंदरजीत सिंग परमजीत सिंग (३५ , रा. नरायणगढ ता. जि. संगरूर, पंजाब)  यांनी  याप्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीनुसार ते त्यांचा ट्रक घेऊन मलकापूर रस्त्यावरील बालाजी मंदिराजवळून जात होते. दरम्यान, दुचाकीवर दोन अज्ञात युवक आले. त्यांनी ट्रक थांबवण्याचा इशारा केला. ट्रक थांबविल्यानंतर कट का मारला असे म्हणून वाद घातला. तसेच अश्लिल शिविगाळ करून ट्रकमधीन रोख ८ हजार रुपये, दोन मोबाइल किमत २० हजार, दोन धनादेश असा २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुलडाणा शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.