राजूर घाटात ट्रक मंदिराच्या ओट्याला धडकला

सुदैवाने जिवीत हानी नाही
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजूर घाटातील वनदुर्गा माताच्या मंदिराच्या ओट्याला २० नोव्हेंबरला पहाटे पाचच्या सुमारास वळण घेताना ट्रक धडकला. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र ट्रक आणि ओट्याचे नुकसान झाले.
एमपी ०९ जीएच ९८३३ क्रमांकाचा ट्रक हा बंगळुरूवरून माल भरून इंदौरकडे जात होता. चालक आणि क्लिनर बुलडाणा मार्गाने राजूरच्या घाटातून जात असताना अचानक नियंत्रण सुटून ट्रक मंदिराच्या ओट्याला धडकला. दुसरा ट्रक बोलावून माल त्यात भरून मालाची पर्यायी व्यवस्था केली आहे.