खामगावात 'त्या' भामट्याने भररस्त्यात महिलेला अडविले अन्... नेमके प्रकरण काय वाचा!

 
Khm
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भररस्त्यात महिलेला अडवून बँकेची खोटी बतावणी करून महिलेच्या जवळील पोथ लंपास केल्याची घटना गुरुवारी,९ मे रोजी खामगाव शहरातील केडिया टर्निंग भागात घडली. महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
फिर्यादी उर्मिला बोडखे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरूवार ९ मे रोजी केडिया टर्निंग पॉईंट नजीक अर्जुन जलमंदिर जवळून जाताना एका अनोळखी इसमाने त्यांना थांबवले व बँकेचे उद्घाटन आहे, पाच हजार रुपये अनुदान वाटप सुरू आहे. तुमच्या कानातील व गळ्यातील सोन्याच्या वस्तू पाहून तुम्हाला अनुदान देणार नाहीत, म्हणून तुम्ही सोन्याच्या वस्तू काढून ठेवा असे म्हटले. त्याचा सांगण्याप्रमाणे बोडखे यांनी गळ्यातील ३१ हजाराची सोन्याची पोथ रुमालात बांधून बाजाराच्या पिशवीत ठेवली. या दरम्यानच त्या अज्ञात भामट्याने हात चलाखीने त्यांच्या हातातील थैलीमधून सोन्याची पोथ अलगदपणे लंपास केली. काही वेळानंतर घटना लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बोडखे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.