खामगावात शेतकऱ्यांना मूळ किमतीपेक्षा सोयाबीनची जास्त भावाने विक्री करणे भोवले!अंकुर कृषी केंद्र सील! आज होणार सुनावणी..

 
dfg

खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुळ किमतींपेक्षा जास्त भावात सोयाबीनचे बियाणे विकण्याचा सर्रास प्रकार खामगावात चालू आहे.  काल,३१ मे रोजी अंकुर कृषी केंद्र सरकी लाईन (खामगाव) येथे सोयाबीनच्या दोन बॅगची एम आर पी आहे ३६०० रुपये त्या शेतकऱ्याला ३६०० रुपयाचे बील दिले मात्र त्याच्याकडून प्रत्यक्ष ४२०० रुपये घेण्यात आले आहेत.पिंटू लोखंडकर रा . नागापूर ता - खामगाव असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे शाम अवथळे यांनी आणि आक्रमक पवित्रा घेत थेट अंकुर कृषी केंद्रावर का कारवाई करू नये असा प्रश्न उपस्थित केला होता.

 खामगाव तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री देसाले ह्या अंकुर कृषी केंद्रावर पोहचून त्यांनी पंचनामा केला होता.रात्री या कृषी केंद्राला व गोडावूनला सील करण्यात आले आहे. आज परवाना अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
जिल्हा कृषी अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र धारकांवर कायदेशीर कारवाई करावी याचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाम अवताळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी अंकुर कृषी केंद्रावर गर्दी केली होती.