चिमुकली हत्याकांड प्रकरणात महत्वाचे अपडेट! काल, हैवान सद्या रोडगे पकडला होता,आज काय झालं? पुढच्या ३ दिवसांत काय...

 
crime
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  ६ वर्षाच्या कोवळ्या निरागस निष्पाप बालिकेला वासनेची भूक मिटवण्यासाठी कुस्करून टाकणाऱ्या हैवान सदानंद रोडगे याला काल,१७ मे रोजी पोलिसांनी अटक केली. आज,१८ मे रोजी याप्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहे.
 

पॉर्न व्हिडिओ आणि गाजांचा शौकीन असलेल्या सद्याने चिमुकलीला पोंग्याचे आमिष दाखवले, त्यानंतर तो तिला मंदिरामागाच्या डोंगराळ भागात घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यावेळी चिमुकलीने जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रतिकारात त्याच्या गालावर तिच्या हाताचे नखं लागले होते. हत्या केल्यानंतर नराधम सद्याने तिच्या मृतदेहावर दगडाची पाळ रचली. कोणताही पुरावा मागे न सोडणारा सद्या मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटला नाही.

 तीन दिवसांचा पीसीआर..!

पोलिसांनी नराधम सद्याला आज,१८ मे रोजी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा साधा लवलेश  दिसत नव्हता. पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची विनंती केली. न्यायालयाने ती मंजूर केली असून पुढचे ३ दिवस सद्या पोलीस कोठडीत राहणार आहेत. या प्रकरणाशी निगडित काही महत्वाचे पुरावे पोलीस अजून गोळा करणार आहेत. सद्या आणखी काही बोलतो का? याकडेही पोलिसांचे लक्ष असेल. पोलीस कोठडी संपल्यानंतर सद्याची कारागृहात रवानगी होईल.