राधिका हत्यांकाड प्रकरणात महत्वाचे अपडेट! वाचा खरं खर काय..?

 
Andhera
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राधिकाच्या हत्याप्रकरणात पोलीस मुळाशी पोहचले असल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने आज १७ मे च्या सकाळीच प्रकाशित केले होते. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली, त्यातून निवडक संशयितांपर्यंत पोलीस पोहचले असल्याचे म्हटले होते. मारेकऱ्याने आधी अत्याचार केला असावा आणि नंतर गळा आवळून खून केला असावा अशी शक्यता बुलडाणा लाइव्ह ने घटनेच्या दिवसापासून व्यक्त केली होती..

दरम्यान आज,१७ मेच्या दुपारी  काही व्हॉट्स ॲप गृपवर राधिकाचा मारेकरी पकडल्याचे व्हायरल झाले.  बुलडाणा लाइव्ह च्या वृत्तावर विश्वास असणाऱ्या वाचकांनी  व्हायरल मॅसेज ची सत्यता पडताळून पाहण्यासाठी बुलडाणा लाइव्ह ला फोन केले. यावर बुलडाणा लाइव्ह ने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, सकाळी जी स्थिती होती सध्याही तीच आहे. संशयीताची चौकशी सुरू आहे, अद्याप अटकेची कारवाई नाही असे सांगण्यात आले. मात्र असे असले तरी काही तासांत या हत्यांकडांचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे. जिल्हाभरातील वाचकांना त्याबाबतचे अपडेट बुलडाणा लाइव्ह वर वाचायला मिळेल.