म्हणे मी पत्रकार! एकलारा गावच्या तोतया पत्रकाराविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा केला विनयभंग..

 
jjfj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत तोतयागिरी करणाऱ्या एका भामट्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चुकीचे वर्तन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. शेख अजहर शेख रशीद असे तोतया पत्रकाराचे नाव असून तो एकलारा येथील रहिवाशी आहे.
 

 एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मीनाक्षी काळे यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. ३० सप्टेंबरच्या सकाळी शेख अजहर  एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्याने धक्काबुक्की देखील केली. तुमची सी. ई. ओ मॅडम कडे तक्रार करून निलंबित करायला लावतो, टिव्हीवर बातमी लावतो अशी धमकी दिल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  शिवाय तक्रारदार महिला डॉक्टरांकडे पाहून लज्जा वाटेल असे अश्लील हावभाव केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून चिखली पोलिसांनी शेख अजहर शेख रशीद विरोधात भादवी च्या कलम ३५३,३८४,५०६,५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहेत.