दिसलं तस नव्हत! त्याला वाटलं ट्रक धावतोय पण घात झाला; २० वर्षीय तरुणाचा जीव गेला! नांदुरा - मलकापूर रस्त्यावरील धक्कादायक घटना...

 
नांदुरा
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) समोर ट्रक धावत असल्याचा भास होऊन भरधाव वेगात धडक देऊन दुचाकीस्वार एक युवक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना काल १७ जूनच्या सकाळी नांदुरा मलकापूर रोडवर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. याबाबत फिर्यादी प्रशांत सखाराम लाहुडकर रा. भूत बंगला शेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल दशरथ काळे (वय २०) रा. दसनूर तालुका रावेर व शुभम मुकुटराव निळे रा. नारखेड तालुका शेगाव हे दोघे बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्याकरिता वाघूळला चालले होते. यावेळी नांदुऱ्यावरून मलकापूरकडे जात असताना आरजे ३९, जीए १६०२ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक निष्काळजीपणे रत्यावर उभे करून इतर वाहनांना वापरण्याकरिता धोका व अडथळा किंवा कोणत्याही सूचनेचे फलक न लावता किंवा खुणा रस्त्यावर न लावता उभा केला होता. दरम्यान, दुचाकी स्वारास ट्रक सुरू असल्याचा भास झाला व त्यामुळे त्याची एमएच ३०-एके २८२८ या क्रमांकाची दुचाकी उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यामुळे प्रज्वल दशरथ काळे यांच्या डोक्याला मार लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला शुभम निळे हा जखमी झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर भादवि २७९, ३०४ (अ), ३३८, २८३ सह मोटर वाहन कायदा कलम १२२/ १७७ खाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमलदार संजय निंबोळकर करीत आहेत.