सोन्याचे बिस्कीट पचले नाही! निर्मलाबाईला चिखली पोलिसांनी केले जेरबंद!

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील प्रियंका ज्वेलर्स मधून सोन्याचे बिस्कीट तीन अनोळखी महिलांनी चोरी केल्याची तक्रार ७ जानेवारीला शहर ठाण्यात दाखल होती. दरम्यान  शोध सुरू असतानाच गुप्त माहिती आधारे एका महीलेला चिखली पोलिसांनी काल १८ जानेवारी रोजी चिखली बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.  निर्मलाबाई काळे (६२ वर्ष, रा अंबड जि. जालना) असे  महिलेचे नाव असून तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या सहकारी महिलांचा शोध सुरू आहे. दरम्यान न्यायालयाने तिला एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली, त्यादरम्यानच चोरी करण्यात आलेला मुद्देमाल  अंबड येथील शंकरनगर भागात ठेवल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

६ जानेवारी रोजी निर्मलाबाईने अन्य दोघींसह चिखली शहरातील प्रियंका ज्वेलर्स मध्ये चोरी केली. त्यामध्ये सोन्याचे बिस्किट किंमत

 (४ लाख १ हजार ३२० रुपये) लंपास केल्याची तक्रार शहर ठाण्यात दाखल  आली होती.  ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात डी.बी.पथकाला तपासाचे आदेश होते. आरोपींपैकी एक महिला काल पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतली. अन्य महिला आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पथकात ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नितीन चव्हाण, अंमलदार अमोल गवई, राजेश मापारी, पंढरी मिसाळ, प्रशांत धंधर, सागर कोल्हे ,निलेश सावळे, राहुल पायघन, रोहिदास पांढरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रूपाली उगले, पंचशीला ससाने, प्रियंका पन्हाळ यांनी सहकार्य केले.