पती घरी नव्हता, ती दोन मुलींना कुशीत घेऊन झोपली होती! मध्यरात्री दिडला वासनांध घरात घुसला अन् नको ते केलं...! खामगावची धक्कादायक घटना...

३० वर्षीय विवाहीसोबत त्याने नको ते केलं होत. एकनाथ मधुकर खोंडे(३०) असे शिक्षा झालेल्या वासनांध आरोपीचे नाव आहे. घटना २०१३ च्या एप्रिल महिन्यातील आहे. २६ एप्रिल च्या रात्री पीडित ३० वर्षीय महिला तिच्या दोन मुलींना जवळ घेऊन झोपली होती. महिलेचा पती बाहेरगावी गेलेला होता. आरोपी एकनाथ खोंडे याला महिलेचा पती घरी नसल्याचे माहीत होते. त्याच संधीचा फायदा उठवायचे खोंडे याने ठरवले.
मध्यरात्री दिडला एकनाथ खोंडे पीडित महिलेच्या घरात घुसला तेव्हा महिला व तिच्या मुली गाढ झोपेत होत्या. त्यावेळी खोंडे याने महीलेशी लगट करण्याचा प्रयत्न सुरू केला,वाईट उद्देशाने महिलेच्या अंगाला स्पर्श करू लागला. महिलेला जाग आल्याने महिलेने केलेल्या आरडाओरड मुळे महिलेच्या मुली झोपेतून उठल्या,त्यांनीदेखील आरडाओरड केल्याने आरोपी एकनाथ खोंडे पळून गेला. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी खोंडे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी केला. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.सरकारी वकिलांनी या प्रकरणी ९ साक्षीदार तपासले, पीडित महिलेच्या मुलीची साक्ष याप्रकणात महत्वाची ठरली. अखेर खोंडे याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश पी.पी. कुळकर्णी यांनी खोंडे याला ५ वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी ४ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.