नवरा म्हणाला, मुलीला शिकू दे! बायकोला आला राग... तिने उचलले "हे' पाऊल!!; शेगाव शहरातील घटना

 
file photo
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलीला अभ्यास करू दे. तिला घरकाम सांगू नको, असे नवऱ्याने सांगितल्याने बायकोला राग आला. रागाच्या भरात ती घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेली. ३० डिसेंबर रोजी शेगाव शहरातील तीनपुतळे भागात ही घटना घडली. ४ दिवस होऊनही बायको परतली नाही. अखेर नवऱ्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात काल, २ डिसेंबर रोजी बायको हरविल्याची तक्रार दिली.

सौ. वर्षा अतुल शेगोकार (२९, रा. तीनपुतळे, शेगाव) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती अतुल शेगोकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ डिसेंबर रोजी ते मजुरी करून घरी परतले. त्यांची ७ वर्षांची मुलगी अक्षरा घरात काम करत होती. तेव्हा अक्षराला शिकू दे. तिला घरकाम नको करायला सांगत जाऊ. तिचा अभ्यास होणार नाही, असे अतुलने पत्नीला सांगितले.

या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पती अतुल दुसऱ्या खोलीत झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर शेगोकार यांना पत्नी दिसली नाही. आजूबाजूला, मित्र मंडळी, नातेवाईक सर्वांकडे शोध घेऊनही पत्नी मिळून न आल्याने काल रात्री शेगाव शहर पोलिस  ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. तपास शेगाव शहर पोलीस ठाण्याचे जमादार संतोष गवई करीत आहेत.