अशी कशी माता... गोंडस बाळाला टाकून गेली...!

जिल्हा रुग्णालयातील प्रकार
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेजवळ एक माता १ महिन्याच्या गोंडस बाळाला टाकून निघून गेली. ही घटना आज, २५ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समोर आली.
शिशू मुलगी असून, नर्स कर्मचाऱ्यांना ती सर्वप्रथम दिसली. त्‍यांनी तातडीने डॉ. राधा भानुसे यांनी माहिती दिली. घटनेची माहिती बुलडाणा शहर पोलिसांनाही देण्यात आली. सध्या बाळाची तब्येत चांगली आहे. बाळाला टाकून जाणारी महिला सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आली आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्‍हता.