शेतातून काम करून घरी जाणाऱ्या विवाहितेचा धरला हात!म्हणे, तु माझ्याशी बोलत का नाही? माझ्याशी संबंध ठेव! खामगाव तालुक्यातील घटना..

 
kdh

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भर रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोलत का नाही? तुला माझ्याशी सबंध ठेवावे लागतील असे म्हणून ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आसा गावात घडली आहे.

३५ वर्षीय विवाहिता काल संध्याकाळी शेतातून काम करून घरी जात होती.यावेळी प्रशांत आत्माराम तायडे (वय वर्ष - ३५ रा. आसा दुधा, ता - खामगाव) याने तिला रस्त्यात अडवले. "तू माझ्याशी बोलत का नाही?" तुला माझ्याशी संबंध ठेवावेच लागतील असे तो महिलेला म्हणाला. यावेळी त्या विवाहितेने प्रशांत च्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, त्याला नकार दिला. प्रशांतने रागात विवाहितेचा हात धरून  जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असे पीडित विवाहित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.हिवरखेड पोलिसांनी पीडितेच्या तक्रारारीवरून प्रशांत तायडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.