ती लहान असतानाच तिचे आई-वडील वारले; आता १६ वर्षांची झाल्यावर रणजित ची वाईट नजर पडली अन् नको ते झालं! संग्रामपुरातील धक्कादायक घटना

 
Ps
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत १०० पेक्षा अधिक अपहरणाच्या घटना घडल्यात. अल्पवयीन मुलींना उचलून नेणे, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे या घटना सातत्याने वाढत आहे. संग्रामपूरातील एका १६ वर्षीय मुलीचे देखील अपहरण झाल्याचा प्रकार समोर आलाय. आई वडील वारलेले असल्याने आजीसोबत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडलाय..मुलीच्या आजीने तामगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
 तक्रारीनुसार पीडित १६ वर्षीय मुलगी लहान असताना तिचे आई वडील वारले.त्यामुळे मुलगी तेव्हापासून आजीजवळ राहते, तिला एक लहान भाऊ देखील आहे. मुलीची आजी मजुरी करते..
   
गेल्या दोन महिन्यांपासून गावातील रणजित नरसिंग पवार नावाचा तरुण मुलींच्या मागे लागला होता. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या आजीच्या कानावर या प्रकरणाची कुणकुण लागलेली होती. 
 
३० ऑक्टोबरला मुलीची आजी कापूस वेचायला गेली होती. दुपारी ४ वाजता मुलीची आजी घरी आली तेव्हा तिला मुलगी दिसली नाही. मुलीच्या आजीने मुलीच्या भावाला विचारले असता दुपारी दीड वाजेपासून ती घरी नसल्याचे त्याने सांगितले.
  संशय खरा ठरला..
मुलीच्या आजीला रणजित वर संशय असल्याने त्याच्या घरून विचारपूस केली असता तो देखील दीड वाजेपासून घरी नसल्याचे कळले. मुलीच्या आईने रणजित च्या वडिलांना विचारणा केली असता " तुमची मुलगी माझ्या मुलाने पळवून नेली, तुम्हाला जे करायचे ते करून घ्या" अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या आईने तातडीने तामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी रणजित आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...