हृदयद्रावक! शेतात काम करतांना विजेचा शॉक लागला! ताराला चिकटलेल्या लेकाला वाचवायला बाप धावला अन् दोघांचाही जीव गेला! मुरादपुर येथील काळीज हेलावणारी घटना

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखली तालुक्यातील मुरादपूर येथे आज, १३ जूनच्या सायंकाळी घडली. दोघे मृतक बापलेक मेरा बुद्रुक येथील असून ते मुरादपुर येथे गाडेकर यांच्या शेतात मजुरीसाठी आले होते. 
 प्राप्त माहितीनुसार मेरा बुद्रुक येथील रामेश्वर उत्तम पडघान (४५) व त्यांचा मुलगा वैभव रामेश्वर पडघान(२२) हे दोघे बापलेक समाधान संतोष गाडेकर गाडेकर यांच्या शेतात विजेचे तार ओढण्याचे काम करण्यासाठी आले होते. यावेळी शेतातील विजेचे तार ओढण्याचे काम करीत असताना त्यात अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. यावेळी मुलगा वैभव तारांना चिकटल्याचे लक्षात येताच रामेश्वर पडघान वाचवण्यासाठी धावले मात्र त्यांनाही शॉक लागल्याने ते जागीच कोसळले. या घटनेत दोघा बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महावितरण चे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. विजेचे काम करीत असताना महावितरण ची परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर विजेचा प्रवाह का सुरू झाला? नसेल घेतली तर विनापरवानगी काम करण्यात येत होते का? असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहे.