पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापकाची वाईट नजर!; खोलीत बोलावून केले घाणेरडे कृत्‍य!!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

 
rape
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या विधवेचा मुख्याध्यापकाने विनयभंग केला. काल, ८ जानेवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास निमगाव (ता. नांदुरा) येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत घडली. महिलेने मुख्याध्यापकाच्या तावडीतून सुटून थेट नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापक रुस्तम रामभाऊ होनाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच मुख्याध्यापक फरारी झाला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गावातीलच ३८ वर्षीय विधवा शाळेत खिचडी शिजविण्याचे काम करते. काल सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्याध्यापक होनाळे याने तिला फोन केला. तुमच्या किटच्या सामानाचे पैसे आले आहेत. तुमची सही पाहिजे. याकरिता शाळेत या, असे म्हणत शाळेत बोलावून घेतले.

महिला शाळेत आल्यावर त्याने महिलेकडून सही करून घेतली. नंतर कार्यालयातील पेट्या साफ करायला सांगितल्या. एक पेटी कपाटावर ठेवायला सांगितल्याने तिने खुर्चीवर उभे राहून पेटी कपाटावर ठेवली. महिला खुर्चीवरून उतरल्यावर पायात चप्पल घालत असताना होनाळे याने तिच्या मागून येत दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले व मागून वाईट उद्देशाने पकडत विनयभंग केला. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने होनाळे याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून थेट नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापक एक साहित्यिकसुद्धा आहे. वऱ्हाडातील बिऱ्हाड या पुस्तकाचा तो लेखक आहे.