सायकल खेळता खेळता ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेला! १० वर्षीय बालक ठार; बुलडाणा शहरातील इक्बाल चौकात झाला अपघात

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या इक्बाल चौकात काल,१८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अपघात झाला. आयशर ट्रकच्या चाकाखाली येऊन १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार इक्बाल चौकातील स्मशानभूमीकडे जात असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकात सायकल खेळणारा मुलगा अडकला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. गणेश विजय घुडे (रा. जौहर नगर, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तणाव नियंत्रणात आणला. आयशर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.