Amazon Ad

अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला पण बाहेर आलाच नाही ; ओंकारेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या नांदुराच्या २१ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू!

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मित्रांसोबत ओंकारेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या नांदुरा येथील २१ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना ६ जून रोजी उघडकीस आली. 
    प्राप्त माहितीनुसार, नांदुरा येथील रहिवासी ओम संजय पेठकर हा काही मित्रांसोबत ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, ५ जून रोजी सकाळच्या सुमारास तेथील नर्मदा नदीत अंघोळ करण्यासाठी पाण्यात शिरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्याच्या इतर मित्रांनी त्याला खूप शोधले. तरी देखील ओम दिसत नसल्याने मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना ही बाब कळविली. पोलिसांनी पाण्यात शोध घेऊन ओमला बाहेर काढले.
मात्र बराच वेळ निघून गेल्याने ओम पेठकर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असे स्पष्ट झाले. ओंकारेश्वर येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नांदुरा येथे आणण्यात आला. त्यानंतर ६ जून रोजी सकाळी मृतक ओमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो खामगाव येथे पॉलिटेक्निक कॉलेजला शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाचे धडकताच संपूर्ण नांदुरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.