शेतातील काम आटोपून आजोबांसोबत दुचाकीवर घरी येत होते;मध्येच काळाचा घाला! खामगाव - चिखली रोडवरील घटना!

 
jkdfk

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतातील काम आटोपून आजोबांसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या दोन तरुणांना भरधाव कार ने समोरून धडक दिल्याने एकाच जागीच मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे घडली आहे.

 शेतातून काम आटोपून कचरू परबत चव्हाण (८०, रा.अंत्रज ता - खामगाव) आपल्या दोन नातवांसोबत नरेश पांडुरंग चव्हाण (२२) मुन्ना रमेश चव्हाण (२०) दोन्ही रा. अंत्रज हे शेतातून काम आटोपून ४ आक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी घेऊन घरी येत होते. 

  यावेळी खामगावकडून येणाऱ्या भरधाव (२८- बी क्यु ९२८३)  मारुती सुझुकी कंपनीच्या चारचाकी कार ने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने, निष्कळजीपणने चालवून नरेश चव्हाण चालवीत असलेल्या दुचाकी क्रमांक ( एम एच २८ ए एल - ९१६९) ला खामगाव - चिखली रोडवरील हॉटेल फोरसिजन जवळ समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये नरेश पांडुरंग चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुन्ना चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचे नुकसान केले आहे. अशी तक्रार कचरू परबत चव्हाण खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास सपोनि प्रफुल्ल गाडेकर करीत आहेत.