बँकेतून दोन लाख रुपये काढून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवले; थोड्यावेळाने बघून पाहतात तर गायब..! खामगाव शहरातील घटना
Aug 22, 2024, 17:27 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बँकेतून काढलेले दोन लाख रुपये मोटरसायकलच्या डिक्कीतुन गायब झाल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात उडकीस आली आहे.
वामन माणिकराव गायकवाड (६२) रा. सुटाळा खुर्द यांनी २१ ऑगस्ट रोजी खामगावच्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून दोन लाख रुपये काढले त्यांनतर ते पैसे त्यांनी आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवले होते. त्यानंतर ते जलंब नाका येथे दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या दुचाकीची डिक्की उघडून पाहिली तर त्यामध्ये ठेवलेले दोन लाख रुपये व बँकेचे पासबुक दिसून आले नाही. गायकवाड यांनी तशी तक्रार खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध जाऊन दाखल केला. पुढील तपास पी एस आय दीपक करीत आहेत.