वृध्दाच्या हातातील पैसे हिसकावून काढला पळ! काही तासातच पोलिसांनी चोरट्याला घेतले ताब्यात, खामगाव शहरातील घटना

 
Devkar
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील टिळक पुतळा भागात एका वृद्धाच्या हातातून पैसे हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. काल ६ मार्चला ही घटना घडली होती. 
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील पातोडा येथील तुळशीराम उदयभान लगर (वय ८१ वर्ष). हे मंगळवारी खामगावात होते. त्यांनी बँक ऑफ बडोदा येथून प्रधानमंत्री सहाय्यता योजनेचे सहा हजार रुपये काढले. त्यानंतर एका ऑटोने ते टिळक पुतळा परिसरात गेले. त्याठिकाणी आपल्या खिशातील पैसे काढून मोजत असतानाच ,एका भामट्याने त्यांच्या हातातील पैसे हिसकावून पळ काढला. त्यांनतर लगर यांनी लगेचच शहर पोलीस ठाणे गाठले. अज्ञाताने पैसे हिसकावल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास चक्रे फिरली. अवघ्या काही तासातच शहर स्टेशनचे एएसआय. मोहन करुटले व प्रमोद बावसकर यांनी चोरटा इस्माईल खान उस्मान खान (वय३२ वर्ष) याला टिळक मैदान परिसरातून अटक केली. त्याच्याकडून १८०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.